बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाजी भिडे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा”

मुंबई | यंदाही कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. दुसरीकडे आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही याबाबत अजब वक्तव्य केलं होतं. वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, असं संभाजी भिडे म्हणाले होते. त्यावर आता कारवाईची मागणी होत आहे.

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वारंवार चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. काल त्यांनी वारी होत नसल्यामुळं महाराष्ट्रात कोरोना पसरत आहे, असं वक्तव्य केलं. तर मास्क घालणं हा मुर्खपणा आहे, असंही ते म्हणालेत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. असं रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आम्ही विनंती करत आहे की, त्यांनी सरकारच्या वतीनं संभाजी भिडे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावेत, अशी मागणी देखील सचिन खरात यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे, असं म्हणत वारीला परवानगी देण्याबाबत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुखांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं आहे. संभाजी भिडे यांच्या वारंवार करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More