Top News महाराष्ट्र सांगली

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’; संभाजी भिंडेंची मागणी

सांगली | नोटेवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते सांगलीत बोलत होते.

या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत असल्याचंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपुर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी असंही संंभाजी भिडेंनी सांगितलं.

दरम्यान, या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांना जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसं  या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना पाहिजेच असल्याचंही भिडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार- अनिल देशमुख

या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे

‘लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नाही’; पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या