Top News महाराष्ट्र सांगली

या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे

मुंबई | या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत असल्याचं शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.

बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपुर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी असं संंभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह अखंड चालू राहिल पुढे यासाठी खटपट केली पाहिजे. पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक असल्याचंही भिडे म्हणाले.

दरम्यान, एका चौकाचं नाव काय पण संपूर्ण देशाचं नाव हिंदुस्थान नावानं ओळखला गेला पाहिजे इतकी महत्त्वाची आहे शिवसेना असं भिडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नाही’; पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

‘फडणवीस आणि पाटलांनी पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर दिली होती’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

“राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या