बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजी भिडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

रायगड, 22 फेब्रुवारी 2019 | शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यावरून रायगडच्या दिशेने प्रवास करत असताना त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संभाजी भिडे यांना कमी रक्तदाबाचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

संभाजी भिडे हे राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. या कार्यक्रमांच्या धावपळीमुळे त्यांना हा त्रास झाला असावा असा प्राथमिक अंदाज रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना CBI ने बजावला समन्स

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, पाहा आकडे

दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला- नरेंद्र मोदी

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More