सांगली | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) त्यांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेले संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सांगलीतील मिरज येथील एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी छत्रपती शिवजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल आपली भूमिका मांडली. हिंदुस्तानला सध्या म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा या तीन बाधा झाला असल्याचं वक्तव्य संभाजी भि़डे यांनी यावेळी बोलताना केलं आहे.
सबंध जगाचा त्राता म्हणून हिंदुस्तानला ताकद मिळवायची असेल तर एकच उपाय आहे. सबंध हिंहुस्तानचा रक्तगट बदलायला हवा. 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीवर एकच तोडगा म्हणजे देशातील सर्व 123 कोटी लोकांचा रक्तगट बदलायला हवा, असं संभाजी भिडे म्हणाले आहे. तर महाराजांना प्रिय असणारं कार्य पूर्ण कसं होईल यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न करायला हवा, असंही संभाजी भिडे यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
तुरूंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय अहवालातून ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन
“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”
छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.