Top News पुणे महाराष्ट्र

शिवजयंतीवर निर्बंध मग राष्ट्रवादीचा वशाटोत्सव अन् संमेलनावरही बंदी घाला- संभाजी ब्रिगेड

पुणे | राज्यात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीवर महाविकास आघाडी सरकारने निर्बंध आणले आहेत. यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक  भूमिका घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत, ज्यामुळे शिवप्रेमींचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. यासोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या वशाटोत्सवावर तसेच साहित्य संमेलनावर देखील बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिंदे म्हणाले, नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार ५० लाख रुपये देणार आहे. मंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असल्यामुळे त्यांनी नाशिक मनपा व जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 50 व 25 लाख रुपयांची दबाव टाकून मागणी केलेली आहे. ज्या महात्मा फुलेंनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भटा-बामणांचे संमेलन आहे, इथे आमच्या लोकांचे प्रश्न सुटत नाही, त्यांची चर्चा होत नाही. अशा संमेलनाला आम्ही जात नाहीत, अशी भूमिका घेतली होती, अशा साहित्य संमेलनाला ते आमंत्रण असून सुद्धा गेले नाहीत. त्याच महात्मा फुले यांच्या नावाने ‘समता परिषद’ काढून छगन भुजबळ महाराष्ट्रात काम करतात आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे, अशी जाहीर चर्चा करतात, हा फुलेंच्या विचारांचा पराभव आहे.

साहित्य संमेलनाचा 50 लाख रुपये अनुदान राज्यातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करावे. आम्ही शिवप्रेमी कार्यकर्ते फुले यांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाहीत. उलट गावागावात जाऊन शिवराय-फुले- शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करू…!! म्हणून महाराष्ट्र सरकारने Covide-19 अर्थात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका असे ते म्हणाले.

दुसरीकडे पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. शिंदे यांनी ‘वशाटोत्सव’ सुद्धा रद्द करण्याची मागणी केली आहे.

1000 लोकांचा ‘वशाटोत्सव’ सुद्धा महाराष्ट्र सरकार व पुणे पोलिसांनी रद्द करावा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्या तिथे ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व वशाट उत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत, अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे असे ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!

गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा

अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!

अखेर सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सनंच विकत घेतलं, इतकी मिळाली किंमत!

सावधान! ‘या’ ठिकाणावरुन पुण्यात यायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या