जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!

Manoj Jarange l मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर थेट शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून आता संबंधित डॉक्टरवर थेट शाईफेक करण्यात आली आहे.

क्लिनिकमध्ये जावून केली शाईफेक :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाशिक येथील सिडको भागात असलेल्या आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील डॉक्टर विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये जावून थेट शाईफेक केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील केली आहे.

याशिवाय या घोषणाबाजीनंतर डॉक्टर विजय गवळी यांनी देखील मी सुद्धा मराठा असं म्हटलं आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याचा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलकांनी सांगितलं की, डॉक्टरला भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. त्यानंतर डॉक्टर भूमिका मांडू लागतात.

Manoj Jarange l डॉक्टरने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? :

संबंधित डॉक्टराकडून मनोज जरांगे यांच्याकडून वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल सोशल मीडियावर करण्यात आली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट डॉक्टराच्या क्लिनिक गाठत त्याच्या तोंडावर शाईफेक केली. यावेळी आंदोलकांनी डॉक्टराच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला आहे.

तसेच मनोज जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे चिडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी देखील सिडको येथील विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाईफेक केली आहे.

News Title :  Sambhaji brigade protestors ink throw on doctor about manoj jarange pati

महत्वाच्या बातम्या –

आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगेंच खळबळजनक वक्तव्य

आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश; कुठे व किती वाजता पाहता येणार

शनीचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ 3 राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार!

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं?, रविकांत तुपकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

भन्नाट फीचर्ससह BYD eMax 7 कार लाँच; जाणून घ्या किंमत