बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

औरंगाबाद | बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी म्हटलंय.

बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं शिवानंद भानुसे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, तर एक डोसमधून…’; केंद्र सरकारची माहिती

धक्कादायक! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

…मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी – नाना पटोले

‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; आचार्य तुषार भोसले भडकले

अनिल देशमुखांचा अचानक दिल्ली दौरा; ईडीची पिडा संपवण्यासाठी नवा मार्ग शोधणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More