Radha Krushna Vikhe Patil | राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krushna Vikhe Patil) यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krushna Vikhe Patil) यांनी केलं. त्यानंतर आता संभाजी ब्रिग्रेडने (Radha Krushna Vikhe Patil) त्यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.
स्वत:च्या मुलाला निवडणुकीत निवडून आणता आलं नाही. त्यांनी असली बेताल वक्तव्य करू नयेत. अन्यथा विखे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसारकार यांनी दिला.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
महायुतीने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर सरकारी स्तरावर चर्चा सुरू आहे. लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडलं. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे. मनोज जरांगे आंदोलन करत भरकटत चालले आहेत. आम्ही देखील मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मराठा समाजासाठी काम करणारे लोकं भरपूर आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krushna Vikhe Patil) म्हणाले आहेत.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे आंदोलन आणि उपोषण करत होते. दरम्यान उपोषण सुटल्यानंतर लक्ष्मण हाके आणि सहकारी नवनाथ वाघमारे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वडीगोद्रीतील ग्रामस्थांना आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी वडीगोद्रीतील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
जालन्यात गावबंदीचे बॅनर
याच आरक्षणाचे पडसाद आता राज्यात उमटले आहेत. जालन्यात गावबंदीचे बॅनर लावण्यात आले आहेत. जालन्यातील रायगव्हाण या गावात लक्ष्मण हाकेंचे आंदोलन आणि उपोषणानंतर ओबीसी समाजा व्यतिरिक्त इतर नेत्यांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांसाठी गावबंदी फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेत्या व्यतिरिक्त इतर अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये. तसे झाल्यास मोठा अपमान करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
News Title – Radha Krushna Vikhe Patil Statement On Manoj Jarange Patil After Sambhaji Brigade Warn
महत्त्वाच्या बातम्या
पिपाणी चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र
“या बांडगुळांनी लोकसभेत हिंदुत्व हिंदुत्व, मुसलमान मुसलमान करत…”
“कितीही टणाटणा उड्या मारूद्यात..”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
पंकजा मुंडेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; ओबीसींकडून जिंतूर बंदची हाक
मोदी सरकार शेतकऱ्यांना करणार खुश?; अर्थसंकल्पात ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता