“स्वामी समर्थ केंद्राच्या गुरुमाऊलींना सहआरोपी करा”, संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad) याला पाठीशी घातल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने अण्णासाहेब मोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कराड फरार असताना दिंडोरी (Dindori) येथील श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) केंद्रात येऊन गेल्याचे तपासात उघड झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ (Prafull Wagh) यांनी शनिवारी नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. “बीडमधील (Beed) आकाच्या आकाचे आका हे स्वामी समर्थ केंद्राचे गुरुमाऊली आहेत,” असा दावा वाघ यांनी केला. देशमुख खूनप्रकरणी मोरे यांनाही सहआरोपी करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ब्रिगेडने दिला आहे.

कराडला पाठीशी घातल्याचा आरोप

संभाजी ब्रिगेडने आरोप केला आहे की, वाल्मीक कराड हा नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामी होता. “दिंडोरीतील केंद्रात दत्तजयंती उत्सवामुळे गर्दी असल्याने मोरे यांना कराड आल्याचे ठाऊक नव्हते, हे म्हणणे चुकीचे आहे. दर्शनासाठी दोन दिवस लागतात का? गुन्हेगाराला पाठीशी घालणे निषेधार्ह आहे,” असे वाघ म्हणाले. त्यांनी पुढे आरोप केला की, “वाल्मीक कराड हा नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामी होता. दिंडोरीतील केंद्रात दत्तजयंती उत्सवामुळे गर्दी असल्याने मोरे यांना कराड आल्याचे ठाऊक नव्हते,” हे म्हणणे हास्यास्पद आहे.

प्रफुल्ल वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना २०२३ मधील खंडणी प्रकरणाचा दाखला देत, राजकीय दबावामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप केला. “मस्साजोगचे सरपंच व्हिडिओ प्रकरणात मोरे यांना कराडने मदत केली होती. राजकीय दबावामुळे पोलिसांनी (Police) पीडितेची तक्रार न नोंदवता चुकीचा गुन्हा नोंदवला,” असा दावा त्यांनी केला.

अण्णासाहेब मोरे यांचा पलटवार-

अण्णासाहेब मोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “देसाई आणि संभाजी ब्रिगेड यांचे आरोपसत्र थांबले नाही, तर दोघांवर कायदेशीर कारवाई; अब्रुनुकसानीचा दावा करू,” असा इशारा मोरे यांनी दिला आहे. त्यांनी या आरोपांचे खंडन करताना, देसाई आणि संभाजी ब्रिगेडने आपले आरोप थांबवले नाहीत तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असून, मोरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.