Top News पुणे महाराष्ट्र

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे | क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.  शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तेंडुलकरवर टीका होत आहे.

या बांधावरुन त्या बांधावर शेतकरी रोज हजारो रन्स काढतो. मातीत सोनं पेरुन सोन्यासारखं पीक काढतो. याची कुठे नोंद नाही. सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज असताना तो शेतकरी विरोधी वक्तव्य करत असल्याचं संतोष शिंदे म्हणाले.

जर शेतकऱ्याने पेरलंच नाही तर ही सेलिब्रेटी मंडळी काय खाणार आहेत, असा सवालही संतोष शिंदेंनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घेतला पाहिजे, असंही म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. . भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, अशं सचिनने म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

पाॅपस्टार रिहानाबद्दल भारतीय लोक इंटरनेटवर शोधत आहेत ‘ही’ धक्कादायक गोष्ट

रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!

…ही सवय आता बदलली पाहिजे; ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर जोरदार टीका

आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- उद्धव ठाकर

“शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ काढून घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या