महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा | महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांचे उत्पन्न वाढवण्याचं काम केलं. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले, असे प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलंय.

निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा मतदारसंघात सुरू आहे.या यात्रेअंतर्गत आ. निलंगेकर यांनी सोमवारी पान चिंचोली, शिरोळ, खडक उमरगा, डांगेवाडी, माचरटवाडी, शेंद, सावनगिरा, बोटकुळ, शिऊर, झरी, लांबोटा या गावांना भेटी देत तेथील नागरिक आणि मतदारांशी संपर्क साधला. यावेळी तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, भाजप संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, विक्रम पाटील, अशोक शिंदे, विजय कुलकर्णी, काकासाहेब जाधव, जनार्दन पाटील, गुंडेराव जाधव, बाबुराव जाधव, विलास पाटील, अविनाश पाटील आदींसह मान्यवरांची त्यांच्या समवेत उपस्थिती होती.

यावेळी बोलताना निलंगेकर म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या. केवळ विकासकामे करूनच सरकार थांबले नाही तर प्रत्येक कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकारने काम केले. लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी यासारख्या योजनातून शेतकरी व गोरगरीब कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा योजना आणि उज्वला गॅस योजनाही दिली. आरोग्यासाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले.

निलंगेकर म्हणाले की, आता शासनाने लाडकी बहीण योजनेचा निधी 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज दिली जाणार आहे. महिला बचत गटांना मिळणारा निधी दुप्पट करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

आमदार निलंगेकर यांनी सांगितले की, सरकारने प्रत्येक कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवत योजनांची आखणी केली.
घरातील प्रत्येक सदस्याचा विचार केला. रोजगार निर्मिती केली. शिक्षणासाठी सुविधा दिल्या. यातून प्रत्येक कुटुंबाला काही ना काही मिळाले.यामुळे कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला असल्याचंंही निलंगेकर म्हणाले.

निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेस ठिकठिकाणी प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावोगाव शेकडो नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी निलंगेकर यांचे स्वागत केले जात असून ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांकडून निवडणुकीतील विजयासाठी निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”

कराळे मास्तरांनी मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला! नेमकं काय म्हणाले

…म्हणून अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; कधीच खरेदी करणार नाहीत स्वतःच घर

महायुती की पुन्हा महाविकास आघाडी, राज्यात कोण मारणार बाजी?; सर्व्हेतून मोठी माहिती समोर