Nilanga | मतदार संघातील प्रत्येक बुथवर अधिकाधिक मतदान झालं पाहिजे. झालेल्या मतदानातील 80 टक्के मते आपल्याला, महायुतीला पडावीत यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं आवाहन माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं.
निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा मतदारसंघात आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. त्या माध्यमातून निलंगेकर नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. शुक्रवारी ही यात्रा महादेव वाडी, वलांडी, हंचनाळ, संगम, डोंगरेवाडी,कमालवाडी,कोनाळी, नागराळ,कमरोधिनपूर व गुरधाळ या गावी पोहोचली.
गावोगावचे नागरिक व मतदारांशी निलंगेकर यांनी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील,माजी कृषी सभापती बालाजीराव बिरादार, माजी सभापती तुकाराम पाटील, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर महाजन, माजी पंचायत समिती सदस्य महेश सज्जनशेटे, सोसायटीचे चेअरमन व्यंकट पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, आठवले गटाचे उपजिल्हाप्रमुख अंकुश ढेरे, माजी जि प सदस्य प्रशांत पाटील, उपजिल्हाप्रमुख अटल धनुरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले की, या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी दररोज नागरिकांच्या भेटीसाठी घेत आहे. यात्रेच्या माध्यमातून पडणारे प्रत्येक पाऊल मला विजयाच्या समीप नेत आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक माझ्या पाठीशी असून त्यामुळेच मला विजयाची खात्री आहे. आजपर्यंत निलंगा मतदारसंघाच्या विकास यात्रेत आपण सर्वजण सहभागी झालात. ही यात्रा अशीच सुरू राहणार आहे. त्यासाठी आता आपल्या पाठबळाची आवश्यकता आहे.
कार्यकर्त्यांनी मतदारसंघात आजवर झालेला विकास प्रत्येक घरातील व्यक्तीची भेट घेऊन त्यांना सांगावा. केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे त्यांना समजावून सांगावी. आपला बूथ जिंकण्याचा निर्धार करावा. निलंगा मतदारसंघातून महायुतीच्या विजयासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने मतदानापर्यंत स्वतःला पक्ष कार्यासाठी वाहून घ्यावे, असं आवाहनही निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं.
गावोगाव या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी निलंगेकर यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. महिलांकडून औक्षणही केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका झटक्यात झालेल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमका काय?
4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!
नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा