‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन

Sambhaji Patil Nilangekar

देवणी | सलग 10 वर्ष अथक मेहनत घेऊन मतदार संघात विकासाची गंगा वाहती केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानाने जगावा असे काम केले आहे. परंतु या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत असून आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीने महायुतीला मतदान करा, असे आवाहन संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केले.

निलंगेकर यांनी शुक्रवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर, चवणहिप्परगा,धोतरवाडी, आरसनाळ, कुमदाळ, होनाळी, सावरगाव, वागदरी, विजयनगर, इंद्राळ, अंबेगाव, येणगेवाडी, टाकळी, बोंबळी खु., जवळगा, हिसामनगर व हेळंब येथे बैठका घेतल्या. चवण हिप्परगा व जवळगा येथे त्यांच्या सभा झाल्या.

ठिकठिकाणी उपस्थितांशी संवाद साधताना निलंगेकर म्हणाले की, विकास प्रक्रियेमुळे मतदारसंघातील एकही नागरिक लाभांपासून वंचित राहिला नाही. विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येकाला मिळत असून त्यामुळे सकारात्मक बदल घडत आहेत. महायुतीच्या वचननाम्यात विधायक घोषणा करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

निलंगा मतदारसंघातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याने विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. भविष्यातही मतदारसंघासाठी पैसा कमी पडणार नाही. ही निवडणूक एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही तर मतदारसंघासह राज्यासाठीही महत्त्वाची आहे. भविष्यातील प्रगतीसाठी ती महत्त्वाची आहे. मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्ती पासून सावध रहा, असे आवाहनही संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar)
यांनी  केले.

निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी सांगितले की, तुमचे मत महिला सन्मान, शेतकरी हित,युवक कल्याण, वृद्धांना आधार, आरोग्य सुविधा, शिक्षण यासाठी महत्त्वाचे आहे. सरकारने वृद्धांना मिळणारा लाभ दीड हजारावरून 2100 करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकांना वाढीव हमीभाव असे निर्णय सरकार घेत आहे. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या 20 तारखेस कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा, असं आवाहनही निलंगेकर यांनी केलं.

या बैठकांना भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर,
माजी सभापती गोविंद चिलकुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे, प्रशांत पाटील दवण हिप्परगेकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, बालाजीराव बिराजदार, माजी जिप सदस्य प्रशांत पाटील, सरपंच राज गुणाले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, निलंगा युवा सेना तालुकाप्रमुख प्रभात पाटील, सरपंच दिलीप भंडे,कल्याण हुपळे,शामसुंदर भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!

ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का!

आम्ही हे करु! मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरेंकडून मोठ्या घोषणा

“शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .