Top News

छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही- संभाजी राजे

मुंबई | मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. याबाबतची फेसबूक पोस्ट राजेंनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशा मधिल काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा, अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात?, असा सवालही त्यांनी मध्य प्रदेश सरकारला केला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आळशी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशाला?- राजू शेट्टी

‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं

महत्वाच्या बातम्या-

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश

‘आमचं उष्ट कोणी खाऊ नये’; गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या