पुणे | यंदा कोरोनामुळे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार नाही. त्यामुळे शिवभक्तांना यावर्षी उत्सव पाहायला मिळणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. शिवजयंती निमित्त यंंदा पुरातत्व खात्याकडून रायगडावर विद्युत रोषणाई केली आहे. या रोषणाईवर खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, अशा शब्दात संभाजीराजेंनी पुरातत्व खात्यावर शरसंधान साधलं आहे.
त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारल्यामुळे आता त्यावर तातडीने कारवाईची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!
गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा
अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!
अखेर सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सनंच विकत घेतलं, इतकी मिळाली किंमत!
सावधान! ‘या’ ठिकाणावरुन पुण्यात यायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक