मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा
पुणे | राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण रंगत असताना खासदार छत्रपती संभाजीराजेंनी (Sambhajiraje Bhosle) आपली पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी संभाजीराजेंनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.
सर्वांना संघटीत करण्यासाठी संभाजीराजेंनी ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आणि आम्ही सर्व एक संघटना स्थापन करणार आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली.
मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करत आहे, असं संभाजीराजे म्हणाले. तर यावेळी बोलताना मी कुठल्याही पक्षात नसल्याचं देखील संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जनसेवा करायची असेल तर राजसत्ता हवी. यंदा मी राज्यसभेची निवडणूक लढवणार. आणि यावेळेस मी अपक्ष म्हणून लढणार आहे, अशी माहिती देखील संभाजीराजेंनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी मनसेची तुफान टोलेबाजी, ‘टोमणे सभा’ म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचलं
गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास
काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल
‘मी पण अयोध्येला जाणार कारण मलाही…’; गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.