Sambhaji Raje | कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांची ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीवर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. या जिल्ह्यात विशाळगड किल्ला आहे. त्याठिकाणी काही महिन्यांपासून आक्रमण करण्यात आल्याच्या अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला अभिमान असल्याचं ते म्हणाले. त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील विशाळगडावर अतिक्रमण झालं. याविरोधात आता संभाजी राजे (Sambhaji Raje) आणि त्यांच्यासह शिवभक्त विशाळगडाकडे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी ही मोहिम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती न घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी विशाळगडावर जाणार असल्याचं सांगितलं. जर गुन्हा झाला तर अभिमान असेल असं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं.
विशाळगडावर कोणताही वाईट प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. केवळ कोल्हापूर नाहीतर राज्यातील अनेक शिवभक्तांनी विशाळगडाकडे वाटचाल केली आहे. यावेळी संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी विशाळगड आणि विशाळगडाचे महाराजांचे केलेलं संरक्षण यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
“कोणत्याही शुभ कार्याला मोहिमेला जायचे असते तेव्हा अंबाबाई, भवानीचे दर्शन घेतो. सिद्दी जोहरने पन्हाळ गडाला वेढा दिला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावर पोहोचले. म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन 13 जुलै रोजी साजरा केला जातो. आज विशाळगड संकटात आहे. या गटाने शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं. ताराराणी यांची राजधानी आहे. विशाळगडावर अतिक्रमण करण्यात आलंय. हे अतिक्रमण कोणीही खपवून घेणार नाही”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
मी एक शिवभक्त आहे. मला शिवाजी महाराजांना वंदना करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मी यापूर्वी देखील विशाळगडावर गेलो आहे. आजही मी विशाळगडावर जात आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा अशी आमची मागणी असल्याचं संभाजीराजे म्हणाले.
“माझ्यावर गुन्हा नोंद झाला तरी मला अभिमान आहे”
“माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला अभिमान आहे. सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी विशाळगडावर जाणार आहेत,” असा ठाम निर्धार संभाजी महाराजांनी व्यक्त केला. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
News Title – Sambhaji Raje Big Statement On Vishalgad Removal Of Encroachment
महत्त्वाच्या बातम्या
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल
माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज भरण्यापूर्वी एकदा वाचून घ्या!
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तो दिवस आता ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित!
बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा
“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”