…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजी राजेंनी सर्व नेत्यांची भेट घेत शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

6 जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यामुळे आज मी घोषणा करतोय येत्या 6 जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं संभाजी राजे म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या गोष्टी तुम्ही मार्गी लावा. नाहीतर मी कोविड वगैरे काहीही बघणार नाही. हा संभाजीराजे आघाडीवर असणार तिथे. समाजाला आम्हाला वेठीला धरायचं नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचं नाहीये. 6 तारखेला लोकांना नाही तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आली. तेव्हाही मी समंजसपणाची भूमिका घेतली. उद्रेक होता कामा नये, असं मी सांगितलं. तेव्हा अनेकांना वाटलं की, संभाजीराजेंची मवाळ भूमिका का? पण त्या भूमिकेनंतर माझ्यावर आरोप केले गेले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात समाजाचं काही घेणं देणं नाही. आमचं मागणं एकच की, आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मिर्झापूर’मधील ‘या’ अभिनेत्यावर लाॅकडाऊनकाळात आली रामलड्डू विकण्याची वेळ?

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; ‘या’ तारखेला येणार नवी नियमावली

‘आम्हाला कोणाच्याही भांडणात रस नाही, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?’; संभाजीराजे कडाडले

बोलण्यास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं केले वार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

विवाहितेनं ‘या’ कारणामुळं सॅनिटायझर पिऊन केली आत्महत्या; नवऱ्याने तिच्या मृत्यूनंतरही केलं लाजीरवाणं कृत्य

6 जूनBjpJune 6Maratha ReservationMarathi NewsSambhaji raje bhosaleUddhav Thackerayउद्धव ठाकरेभाजपमराठा आरक्षणमराठी बातम्यासंभाजीराजे भोसले