Loading...

सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण…- संभाजीराजे भोसले

कोल्हापूर | राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली. याचं कौतुकच आहे पण या निधीचा योग्य वापर आणि वेगात काम करायचं असेल तर ‘कोल्हापूर-सांगली महापूर पुनर्वसन प्राधिकरण’ ची स्थापना करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती लक्षात घेता केंद्राकडे 6800 कोटी रूपयांची मागणी करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण या निधीचा योग्य वापर व्हावा, असं संभाजी राजेंनी म्हटलं आहे.

Loading...

पूरामुळे उद्ध्वस्त झालेली लोकांची घरं पुन्हा नव्याने बांधून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीमधील महापूरामुळे विखुरलेली घरं नव्याने सावरण्यासाठी संभाजी राजेंनी 5 कोटी रूपये मदत म्हणून दिले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

Loading...

-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

-बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ प्रश्नावर भारत भालके झाले निरूत्तर

-मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा

Loading...