बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

कोल्हापूर | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एका शेतकरी कुटुंबासोबत तिफण ओढताना दिसत आहेत. शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव आज घेता आला, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करताना दिसलं. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? पण न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला, असं संभाजी राजे म्हणाले आहेत.

तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला. कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

दरम्यान, जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचं संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, असंही संभाजीराजेंनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी वाढदिवसादिनी आदित्य ठाकरेंकडून ‘लाख’मोलाची मदत!

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसादिनी रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट…

महचत्वाच्या बातम्या-

‘मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…’; कपिल सिब्बल यांचा मोदींना टोला

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

“तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More