Top News राजकारण

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, असं संभाजीराजेंनी भुजबळांना सांगितलं आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “छगन भुजबळ यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढलाय. भुजबळ साहेब आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात, तुमच्या जेष्ठत्वाचा मी आदर करतो. पण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका.”

ते पुढे म्हणाले, “दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळ यांनी बीबीसीच्या मुलाखतीत माझ्या संसदेतील भाषणावर भाष्य केलं. ज्यात मी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग बिलावर माझी भूमिका मांडली होती. त्यांनी माझं ते भाषण त्यांच्या सर्व नेत्यांसोबत बसून ऐकावं.”

महत्त्वाच्या बातम्या

हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात? उर्जामंत्र्यांचं धक्कादायक ट्विट

कलम 370 हटवलेला दिवस काश्मिरसाठी काळा दिवस; मेहबूबा मुफ्तींचा हल्लाबोल

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराची तारिख ठरली; ‘या’ तारखेला हातात घड्याळ बांधणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या