बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

नाशिक | मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मूक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज मूक आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची आमची इच्छा नसल्याचं बोलून दाखवलं आहे.

आजचं नाशिक येथील आंदोलन संपल्यानंतर राज्यातील समन्वयक यांची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.

आक्रमकपणे आंदोलन करायला मोर्चे काढायला अवघे दोन मिनिटे लागतात, पण ते न करता आम्ही लोकप्रतिनिधींनी आपलं मत मांडावं यासाठी हे आंदोलन सुरु केलं आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबरच आरक्षणाचे सध्या कोणते पर्याय उपलब्ध आहेत? हे पाहणं महत्त्वाचं असून पुनर्विचार याचिका व आयोग स्थापन करणं हा एक पर्याय असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या –

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं- राज ठाकरे

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More