…म्हणून मी मुंडे भगिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे- छत्रपती संभाजीराजे

बी़ड | माझ्या मुलींकडे लक्ष द्या असं गोपीनाथ मुंडेनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी प्रीतम मुंडेची भेट घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पाठिंबा देखील दिला. ते परळीत बोलत होते.

मी गोपीनाथ मुंडेंच्या मुलींच्या पाठीमागे भावाप्रमाणे उभा असेन, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, असा विश्वास देखील संभाजी राजेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बीडमध्ये भाजपकडून प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो…पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधीनी माझी जात काढली; हा संपूर्ण मागास जातीचा अपमान-नरेंद्र मोदी

जाणते राजे कृषिमंत्री असून काही केलं नाही; फडणवीस-मोदींची पवारांवर सडकून टीका

-मी मागास जातीचा असल्याने माझ्यावर हल्ला; मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप

-माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी