महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

मुंबई | शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतंच संभाजीराजे यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणविषयी लढ्याचं नेतृत्त्व करावं, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

संभाजीराजेंनी राज्यातील सर्व खासदारांना मराठा आरक्षणप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत राहुल शेवाळे यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली.

दरम्यान, याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष द्यावं. मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून या लढ्याचं नेतृत्त्व संभाजीराजेंनी करावं, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.

 

महत्वाच्या बातम्या-

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा- देवेंद्र फडणवीस

कंगणाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभं केलं तरी…; बच्चू कडूंनी कंगणाची उडवली खिल्ली

प्रशासनाने मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर…- खासदार संभाजीराजे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या