कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे खासदार उदयनराजेंच्या पाठिशी

मुंबई | खंडणी प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता असताना आता कोल्हापूरची गादी उदयनराजेंच्या पाठिशी उभी राहिलीय. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिलीय. 

काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.

असं संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिलाय.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…