बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती संभाजी राजेंकडून श्रीरंग बारणेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…

पुणे | राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मावळमधील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. श्रीरंग बारणे यांच्यामध्ये जी तळमळ दिसते ती फार कमी खासदारांमध्ये असते, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

श्रीरंग बारणेंपेक्षा एकाच गोष्टीत मी सरस आहे. त्यांची उपस्थिती 90 टक्के आहे तर माझी 99 टक्के. तात्पर्य काय तर 90 टक्क्यांपेक्षा उपस्थिती राखणं सोपं नाही, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

जेव्हाव्ही मी फोन करायचो. कुठे आहात आप्पा तुम्ही? ज्या मिनिटाला अधिवेशवन संपायचं त्याच्या पुढच्या क्षणाला मतदारसंघात कसं पोहोचायचं यासाठी त्यांची तळमळ असते. दुसऱ्या दिवशी फोन केला कुठे आहात? तर न चुकता ते अधिवेशनाला हजर राहतात, असंही संभाजी राजे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकी काय परिस्थिती आहे, यासाठी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना माझा सारखा फोन असायचा. आप्पा, काय परिस्थिती आहे? बारणे म्हणायचे राजे काही काळजी करु नका, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

“तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल”

काही चुकलं असेल तर माफ करा; अमोल कोल्हे भावूक

महत्वाच्या बातम्या- 

सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोट जास्त होतात- मोहन भागवत

‘ला जर्नालिस्ट’ महोत्सव उत्साहात साजरा

केंद्राने पैसे थकवल्यामुळेच राज्यापुढे अर्थिक अडचणी- सुप्रिया सुळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More