मुंबई | खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
पश्चिम महाराष्ट्रात मागच्यावेळी पूर आला होता. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे 2800 कोटींची मागणी केली होती. परंतु, त्यावेळी 900 कोटी रुपयेही मिळाले की नाही याची शंका आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी भाजपकडे बोट दाखवलं आहे.
कोल्हापूर-सांगलीच्या पुरावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, असंही संभाजीराजे यावेळी म्हणालेत.
दरम्यान,संभाजीराजे यांनी स्वत: मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंना कोणतं मंत्रिपद मिळणार?, छगन भुजबळ म्हणाले…
“अमृता फडणवीसांबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीसांनी खपवून घेतली असती का?”
‘माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही’; अंजली दमानिया यांचा खडसेंना इशारा