Top News

प्रशासनाने मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर…- खासदार संभाजीराजे

मुंबई | छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांना नोटीस बजावल्या जात असल्याचं सांगत राज्य सरकारने हे तात्काळ थांबवावं अशी विनंती केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

आंदोलकांना पोलीस प्रशासनाने फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे.

प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केलीये.

मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. आज हा लढा स्वतः साठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिलं आहे. न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता,
मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

राजू शेट्टी यांची कोरोनावर मात, पुण्यातील रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणींचं निधन

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 30 जणांसह बोट नदीत बुडाली

“आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा….”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या