बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही?”

नांदेड | शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का?, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी सरकारला केलाय.

न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे मी या मताचा आहे, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

अनेक नवे कार्यकर्ते तयार होतात मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी कसं काम केलं हे माहिती नसतं. शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं नाही, तर अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज देखील माझं स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं सांगतात, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

माझी मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी जवळ यावं. लोकंच जवळ आली नाही तर येऊन उपयोग नाही. खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्यांचं नातंच होऊ शकत नाही. समाज अडचणीत असताना त्याचे धक्केबुक्के खाल्ले पाहिजे. यातूनच प्रेम निर्माण होतं, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गौरी गडाख यांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर

‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करणार’; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

कंगणा राणावतने जो बायडन यांना दिली गजनीची उपमा, म्हणाली…

दिवाळीनंतरचे 15 दिवस अत्यंत कसोटीचे असणार- उद्धव ठाकरे

कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More