मुंबई | मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मराठा समाज आणि मंत्रिमंडळासोबत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे हे उपस्थित होते.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने दोन प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये मराठा समाजाच्या सर्व अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना सुपर न्यूमररी पद्धतीने दुसऱ्यांच्या आरक्षणाच्या मूळ रचनेला धक्का न लावता आपण अधिक संख्येने जागा कशा देऊ शकतो, हे समजावून सांगितलं, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
सुपर न्यूमररी पद्धतीने मराठा समाजासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये जागा कशा वाढवता येतील याबाबत मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण अभ्यासकांनी सविस्तर माहिती दिली. याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्ण सकारात्मक आहेत, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
दरम्यान, सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”
डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!
“महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला”
‘ही’ नावं संपुष्टात येणार; ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार!
सर्वसामान्य नागरिकांआधी नेत्यांना कोरोना लस द्या; शिवसेना नेत्याची मागणी