महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजाशी कुणी दगाफटका करत असेल, तर…- खासदार संभाजीराजे

मुंबई | मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे. यावर खासदार संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज मराठा समाजावर अन्याय झाला. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे, असं संभाजी राजेंनी म्हटलंय.

मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, मग ते महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल, असंही संभाजी राजेंनी स्पष्ट केलं.

अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.

 

महत्वाच्या बातम्या-

पुढील अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अधिकाऱ्याची गाडी फोडल्याप्रकरणी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्या- सुप्रिया सुळे

भारतात PUBG गेम पुन्हा येणार?; कंपनीने घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं पण…- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या