Top News महाराष्ट्र सोलापूर

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

Photo Credit- Facebook/ Sambhajiraje

पंढरपूर | मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजीराजेंना टारगेट केल्यास टीआरपी वाढतो, असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.

शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली विद्यूत रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे. महाराजांचे वास्तव, समाधी असलेल्या रायगडावर अशी लायटिंग चुकीची आहे. पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी. रायगड मॉडेल प्रमाणे दहा किल्ले संवर्धनासाठी घेणार. किल्ले जतन करण्यासाठी फोर्ड फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. पण जतन आणि संवर्धनचा अर्थ देखील पुरातत्व विभागाला माहिती आहे का?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?- करूणा शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या