Sambhaji Raje | छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाळगडावर इतिहास आहे. मात्र त्याच विशाळगडावर अतिक्रमण करण्यात आलं आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी विशाळगडावर शिवभक्तांसोबत वाटचाल केली होती. यावेळी गजापूर येथील हद्दीत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वाहने जाळण्यात आल्याचा देखील आरोप केला आहे. याला आता हिंसक वळण लागलं असल्याचं बोललं जात आहे. काही शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं बोललं आहे.
आंदोलनाला गालबोट
यावेळी पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लागल्याचं दिसून आलं असून आता त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी रात्री शाहूवाडी पोलीस ठाणे येथे 500 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कलम 132, 189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह पोलीस अधिनियम 37 (1) उल्लंघन 135 या नुसार गुन्हा दाखल झाला. याप्रकरणावर तपास सुरू असून इतर नावे समोर आल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करता येणार आहे.
पुण्याचे रवींद्र पडवळ आणि संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी विशाळगडावर आणि विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलनं केली. मात्र त्या आंदोलनाला गालबोट लागले. यामुळे दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप आहे. यातून पोलीस आणखी नवीन माहिती समोर काढतील. विशाळगड आणि आसपासच्या परिसरातील CCTV आणि इतर व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.
शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी याप्रकरणात आक्रमक भूमिका आपल्या अंगावर घेतली आहे. माझ्यावर गुन्हा झाला तरीही चालेल मात्र शिवभक्तांवर गुन्हा होऊ नये, सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी इशारा दिला आहे.
“शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका”
ज्या काळात घटना घडल्या होत्या त्या घडायला नको होत्या. पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने हा निर्णय दोन दिवसांआधीच घेतला असता तर ही वेळ आली नसती. माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नये, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
News Title – Sambhaji raje will be arrested in Vishalgarh encroachment
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत
मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं वक्तव्य; थेट म्हणाले…
रोज सकाळी फक्त एक ग्लास Beetroot Juice पिण्याचे आहेत ‘इतके’ फायदे!
आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..