शिवसेनेनं दुसरा उमेदवार जाहीर करताच संभाजीराजेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
मुंबई | राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने जारी केला आहे. महाराष्ट्रात 10 जून रोजी या रिक्त जागांसाठी मतदान पार पडणार आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी राष्ट्रवादीने (NCP) संभाजीराजेंना (Chatrapati Sambhajiraje) पाठिंबा दर्शवला होता. राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेस (Congress) व शिवसेनेचीही (Shivsena) हीच भूमिका असेल असं वाटत असताना शिवसेनेनं दोन जागांवर उमेदवार उतरवण्याची घोषणा केली.
शिवसेनेच्या या भूमिकेनंतर संभाजीराजेंनी ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना संभाजीराजेंनी खुलं पत्र लिहिलं असून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकांसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या भूमिकेमुळे संभाजीराजेंना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवार म्हणून सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मला निश्चित मदत कराल, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी पत्राद्वारे विधानसभा आमदारांसमोर व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…
प्रति,
सर्व विधानसभा सदस्य,
महाराष्ट्र विधीमंडळआपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. pic.twitter.com/i7Vwu1U7NB
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 17, 2022
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेचा संभाजीराजेंना जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘स्मृती ईराणींवर केलेला हल्ला भ्याड, आता आम्हीही…’; देवेंद्र फडणवीस संतापले
धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू
‘सभा करायच्याच असतील तर…’; दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना आव्हान
‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
Comments are closed.