बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे भोसले घेणार राष्ट्रपतींची भेट

मुंबई | खासदार संभाजीराजे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी झटत आहेत. मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकरण देखील तापलं आहे. अशातच आता संभाजीराजे गुरुवारी राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

2 सप्टेंबर रोजी संभाजीराजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ही भेट मराठा आरक्षणाबाबत असणार आहे. तसेच या भेटीकरिता संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील प्रमुख चार पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचं आव्हान केलं आहे.

संभाजीराजेंच्या आव्हानाला प्रतिसाद देत काँग्रेस खासदार वंदना चव्हान, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेस तर्फे संग्राम थोपटे हे शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या सभेत राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाची स्थिती तसेच सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, अशा अनेक गोष्टी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यात यावा याची देखील मागणी करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

फेरीवाल्यावर राज ठाकरे कडाडले, पाहा व्हिडीओ

लटकत होतं मुलीचं डोकं अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नये!

‘तुम्हाला घंटाच वाजवायची असेल तर…’, संजय राऊतांचा विरोधकांना टोला; पाहा व्हिडीओ

तालिबानला मोठा धक्का! पंजशीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 350 तालिबान्यांना कंठस्नान

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये 7 कोटींसाठी विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More