बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

मुंबई | मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. यातच आता खासदार संभाजी राजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच संभाजीराजे या मुद्द्यावरुन दौरा करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी 25 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे.

मला राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगायचंय की मी पुन्हा एकदा राज्यात दौरा करत आहे. 25 ऑक्टोबरला या दौऱ्याची सुरुवात करणार असून याची सुरुवात रायगडपासून करणार आहे. रायगडपासून सोलापूर, उस्मानाबाद, अहमदगनरचा दौरा आधी करणार आहे.

दरम्यान, राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टीमेट दिला होता तरीही त्यांनी आश्वासनं पाळली नाहीत, असा आरोपही संभाजीराजेंनी सरकारवर केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी तरुणाची रस्त्यावर कसरत, पाहा व्हिडीओ

“पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा”

किरीट सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर हल्ला; म्हणाले, आज दुपारी 1 वाजता…

“कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना मिळणार 50,000 रुपयांची आर्थिक मदत”

पुण्यातील रिक्षा प्रवास महागणार; असे असणार नवे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More