मुंबई | केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे या विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझं मरण सार्थक होईल, असं विवेक रहाडे याने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. यावर
खासदार संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये, असं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय.
माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2020
महत्वाच्या बातम्या-
“अयोध्येत दीड लाख रामभक्त, कारसेवक भजन करण्यासाठी नक्कीच जमले नव्हते”
पराभवासाठी केवळ ऋषभ दोषी नाही- सुनील गावसकर
चिंताजनक! राज्यात 50 हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण
सरकारी अधिकारी त्रास देत असल्याचा डॉक्टरांचा आरोप; राज्यातील 90 डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत
Comments are closed.