बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; मराठा आरक्षणासाठी सुचवला ‘हा’ उपाय

मुंबई | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर केंद्रातील सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली ही याचिका फेटाळण्यात आली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी कोणतीही असाधारण परिस्थिती नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला होता. त्यानंतर आता मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न सरकारसमोर उभा राहिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता खासदार संभाजीराजेंची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एससीबीसी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी दुसरा मार्ग देखील सुचवला आहे. कलम 318 बच्या मार्गातून मागासवर्ग आयोग तयार केला जावा. त्यात गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करुन सर्व माहिती गोळा करावी लागेल. ही माहिती राज्यपालांच्याद्वारे राष्ट्रपतींकडे पाठवावी लागेल. मग राष्ट्रपतींना वाटलं तर, 342 अ नुसार राष्ट्रपती केंद्रीय मागास आयोगाला पाठवू शकतात, मग ते राज्य मागास आयोगाला पाठवतील, मग राष्ट्रपतींना पटलं तर संसदेला देऊ शकतात, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने वटहुकूम काढला तर घटनादुरूस्तीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे राज्यांना अधिकार मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. आता केंद्राचीच मुख्य भूमिका आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे स्पष्ट करावं, अशी जोरदार मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

“भाजपने ईडी आणि सीबीआयचं वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच बाकीये”

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

“विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More