बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर…’; आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाला संभाजीराजेंचं उत्तर

कोल्हापूर | गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढलं आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर खासदार संभाजीराजेंनी उत्तर दिलं आहे.

मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. पण तुम्ही शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर मुख्य प्रवाहात सामील व्हा, असं आवाहन संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आलं. मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत असंही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केलं होतं. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असं संबोधित केलं होतं. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही कोरोनाने मेलो तरी हरकत नाही, मुलांना लस मिळायला हवी होती”

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More