मुंबई | ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं काम अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलं. मात्र ही मालिका आता अंतिम टप्प्यात आहे. मालिका अगदी शेवटच्या टप्प्यात आली असताना मालिकेमध्ये संभाजी महाराजांच्या अटकेचा भागाने सगऴ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील छोट्या पाच वर्षाच्या बाल शंभूप्रेमीचा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चिमुकल्याचा शोध घेवून अमोल कोल्हे यांनी स्वतः या चिमुकल्या शंभूप्रेमीला भेटीचे निमंत्रण पाठवलं होतं.
श्रीयोग माने असं या चिमुरड्या शंभूप्रेमीचं नाव आहे. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातला राहणारा आहे. या चिमुकल्याची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. कोल्हे यांनी चिमुरड्या श्रीयोगची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बालशंभूचा ड्रेस आणि तलवार भेट दिली.
मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी होत होती. दरम्यान, याचे सर्व अधिकार वाहिनीला असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवू नये”
मनसेची नाचक्की! बांगलादेशी म्हणून पकडलेले ते तरुण निघाले उत्तर प्रदेशचे
महत्वाच्या बातम्या-
“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर काही परिणाम होणार नाही”
…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
नाणारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
Comments are closed.