मोठी बातमी! ठाकरे गटातील ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

Anil Deshmukh Win

छत्रपती संभाजीनगर | राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे (Sambhajinagar) माजी खासदार आणि ठाकरे गटाचे  विद्यमान उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी निवृत्तीची घोषणा केलीये. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यापैकी एक उमेदवार ठरवायचा होता. त्यातील चंद्रकांत खैरे यांचं नाव चर्चेत आलं आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आता आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहोत. त्यापुढील निवडणूक अंबादास दानवे किंवा पक्षाने उमेदवार ठरवावा, असं त्यांनी पत्रकार परिषेद घेत सांगितलं. (Sambhajinagar)

“त्यांचं लक्ष जनतेकडे नाही…”

“मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यानंतर 2029 ची निवडणूक मी लढवणार नाही. 2029 ची निवडणूक पक्ष देईल तोच उमेदवार किंवा अंबादस दानवे यांनी निवडणूक लढवावी. यामुळे सर्वांचं लक्ष हे आमच्याकडं आहे. मात्र विरोधक काय करतायत. त्याकडे आमचं देखील लक्ष लागलंयं. महागाई वाढली, बरोजगारी वाढली, त्यांचं लक्ष जनतेकडे नाही. फक्त आमदारांकडे लक्ष देत आहेत,” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केलीय. (Sambhajinagar)

प्रचाराचा आमचा पहिला टप्पा पूर्ण होतोय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. ते 20 तारखेला येत आहेत. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील आणि भागवत कराड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

आमच्यात काही 5 ते 6 गद्दार आहेत. त्यांना तिकीट मिळालं नाही. ते आता ओरडत बसले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील प्रचाराला येतील. सध्या शेतकऱ्यांचे काय हाल चालले आहेत. महागाई वाढली आहे. यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आमची फाईट एमआयएमशी आहे. इम्तियाज जलील यांनी काय काम आणलं ते सांगा? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केलाय. भागवत कराड यांनाही दिल्ली माहिती नाही असं म्हणत खैरे यांनी टोला लगावलाय. (Sambhajinagar)

“बाळासाहेबांचं नाव घेत खोटी भाषणं केलीत”

आमचं भाजपसारखं हिंदुत्व नाही, असं म्हणत त्यांनी भाजवर निशाणा साधला. “नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. यांनी बाळासाहेबांचं नाव घेत खोटी भाषणं केलीत. निधी मिळत नाही म्हणून अजित पवार यांच्यावर बोलेल,” असं खैरे म्हणालेत. त्यानंतर त्यांनी संदीपमान भुमरे यांच्यावरही निशाणा साधला. “भुमरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं?”, असा सवाल खैरे यांनी केला. एमआयएम ही वोट कटींग पार्टी असल्याचं खैरे म्हणाले.

News Title – Sambhajinagar Lok Sabha Candidate Chandrakant Khaire Announce His Political Retirement

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटानं का घेतली माघार?, उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण

पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .