Top News अकोला महाराष्ट्र राजकारण

औरंगाबाद की संभाजीनगर?; काँग्रेस नेते म्हणतात, “हा वाद निरर्थक आणि राजकीय”

अकोला | सध्या राज्यात औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर व्हावं. यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद की संभाजीनगर? हा वाद निरर्थक आणि राजकीय असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

नावापेक्षा शहराचा विकास महत्वाचा असल्याचं म्हणत माणिकराव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि शिवसेनेला प्रत्यक्ष टोला लगावला आहे.

माणिकराव ठाकरे अकोला दौऱ्यावर आले होते तेव्हा ते बोलत होते, तसेच दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पुढं पत्रकारांनी त्यांना बाळासाहेब थोरातांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता, ‘पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर पुढची भूमिका राज्यातील नेते ठरवतील’, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदार दिलीप बनकरांच्या पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश!

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या