बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सगळं काही मॅनेज झालं असं….’; अजित पवारांच्या त्या फोन कॉलबाबत संभाराजेंनी केला गौप्यस्फोट

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापुरमध्ये पहिलं मराठा क्रांती मूक आंदोलन पार पाडलं. यावेळी संभाजीराजेंनी मराठा समन्यवकांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी फोन करून भेटायला बोलवलं असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

अजित पवारांनी यांनी 4 जूनला मला फोन केला होता त्यावेळी त्यांनी आपण मुंबईमध्ये भेटू असं म्हटलं होतं. मात्र आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत मग मी तुम्हाला एकटा कशाला भेटू. जर उद्या कोणी म्हटलं की सगळं काही मॅनेज झालं आहे तर काय करायचं?, असं संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं.

त्यामुळे मी ठरवलं जर भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे. सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयकही  पाहिजे त्यावेळी चर्चा होऊ शकते, असं संभाजीराजे म्हणाले. आंदोलन झाल्यानंतर संभाजीराजेंनी मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संवाद साधला.

दरम्यान, आपण सरकारला अनेक पर्याय दिले मात्र त्याबद्दल कुणी बोललं नाही. आमचा अभ्यास झाला आहे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासोबत चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

‘या’ देशात तब्बल 900 लोकांना एक्सपायर झालेल्या कोरोना लसीचे डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More