बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रायगडावर संभाजीराजेंची गर्जना, पहिल्या मराठा मोर्चाची तारीख अन् ठिकाणही ठरलं!

रायगड | येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही, असं संभाजीराजे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण दिशाभूल करणं रक्तात नाही- खासदार संभाजीराजे

हसतं खेळतं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त; सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरी येताच पतीचाही मृत्यू

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More