Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची 9 डिसेंबररोजी हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण आता आणखीच चिघळले आहे. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी आता राजकीय नेते देखील मैदानात उतरले आहेत. (Santosh Deshmukh Murder)
आज (14 डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची संभाजीराजे छत्रपती यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देखील दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली.
काय म्हणाले संभाजीराजे?
“माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घालायला हवे. अजूनही हा विषय हातातला आहे. लोकांच्या भावना मी ऐकल्या. उद्या काहीतरी स्फोट होईल तर मी जबाबदार असणार नाही. पोलीसांनी साडेतीन तास मजा बघत साधा गुन्हा नोंद केला नाही, आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करूनही तो इकडे तिकडे फिरतो आहे. हे सरकारला कसं चालतंय?”, असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी केला. तसेच, या प्रकरणी मी पूर्णपणे ग्रामस्थांबरोबर आहे, जो ग्रामस्थ निर्णय घेतली त्याबरोबर संभाजीराजे असतील, असंही ते म्हणाले. (Santosh Deshmukh Murder)
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील नागरिकांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गावकरी करत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चार आरोपी अद्यापही फरार आहेत.
सरपंच हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर-
संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना थेट निलंबित करण्यात आलं आहे. त्या पाठोपाठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. (Santosh Deshmukh Murder)
News Title – Sambhajiraje chhatrapati on Santosh Deshmukh Murder
महत्वाच्या बातम्या :
होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर
एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई
करिश्माने हनीमूनच्या रात्री झालेला शारीरिक त्रासाबद्दल केला गौप्यस्फोट!