संभाजीराजेंचा सरकारला इशारा; काही झालं तर सरकार जबाबदार

Sambhajiraje Chhatrpati l आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. अशातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आज अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांना काय झालं तर त्याला सरकार जबाबदार :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मात्र आज उपोषणाचा सातवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. यावेळी उपोषणस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटलांची भेट दिली आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

याशिवाय राज्य सरकार निवांत मुंबईत AC ऑफिसात बसलं आहे. तसेच विरोधी पक्षातील नेते देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. मात्र आता हे चालणार नाही. तसेच हे तुमचं कॅबिनेट आहे ना… मग निर्णय घ्या ना. तसेच यासंदर्भात हो की नाही एकदाच बोलून टाका. तसेच जरांगे पाटलांची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना काही होऊ शकतं. मात्र त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात असं संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.

Sambhajiraje Chhatrpati l संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले? :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र ही बाब राज्यातील इतिहासातील वाईट आहे. जर एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी देखील लावायला बसले आहेत. मात्र त्याची दखल तर नाहीच पण त्यासंदर्भात निर्णय देखील सरकारने घेतलेला नाही.

याशिवाय आता मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज अंतरवली सराटी येथे आलो आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो आहे. पण मला दु:खी वाटतं आहे. वेदना देखील होत आहे. तसेच त्यांनी आता तर सलाईन घ्यायचं देखील बंद केलं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

News Title : Sambhajiraje Chhatrpati Meets Manoj Jarange Patil Uposhan at Antarwali Sarati 

महत्वाच्या बातम्या-

‘वंदे भारत’चे चाक ‘या’ जिल्ह्यात तयार करणार; तरुणांना मिळणार मोठा रोजगार

पितृपक्षात पितर नाराज असतील तर घडतात ‘या’ अशुभ घटना!

अजितदादांची गरज संपली, भाजपकडून आता काटा काढण्याचा प्लॅन?; राऊत स्पष्टच बोलले

आता थेट मुंबईच पाणी बंद करणार! अजितदादाच्या ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा?

..तर असं झालं नाही तर भाजप, शिंदे गट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार?