उस्मानाबाद | उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवकाला दहावीच्या परिक्षेत 94% गुण मिळून देखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्याने त्याचं आयुष्य संपवलं. त्याच मुलाच्या घरी जाऊन खासदार संभाजीराजेंना आपले अश्रू लपवता आले नाहीत.
संभाजीराजे यांनी आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुुटुंबियांची भेट घेतली. आणि भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
कुटुंबिय अक्षच्या आठवणींना उजाळा देत होते. त्याच्या हुशारपणाबद्दल सांगत असताना आणि सध्याची प्रवेश प्रकिया सांगत असताना संभाजीराजेंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
अक्षय देवकर याला डॉक्टर व्हायचं होतं. त्या दिशेने त्याची वाटचाल सुरु होती. त्याने दहावीला 94 टक्के गुण मिळवले तरीदेखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली.
दरम्यान, आरक्षण गेलं खड्ड्यात आधी पदवीपर्यंतचं शिक्षण सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत करा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी दोनच दिवसांपूर्वी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
-रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना
-…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले
-मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे
-सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील
-अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी
Comments are closed.