पुणे महाराष्ट्र

‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले

पुणे | आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?, असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय.

मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सारथीची कल्पना दिली आहे. सविस्तपणे त्यांना हा विषय सांगितला आहे. शरद पवारांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना त्यांनाही सांगितलं. आज मी पुन्हा त्यांना सांगू इच्छितो…शरद पवारसाहेब छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे सारथी संस्था वाचवायची असेल तर त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले.

सारथीच्या स्वायत्ततेचा मुद्दा वर्षभरापासून सुरु आहे. जर याबाबत निर्णय घेता येत नसेल, तर शाहू महाराजांच्या विचार मानणाऱ्यांनी ही संस्था बंद करावी. आपल्याला शाहू महाजारांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही, अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ आमदाराला ED चा मोठा दणका; तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त

“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”

सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या