मुंबई | भारत देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर, असं वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे. शिख धर्मियांचं श्रध्दास्थान असलेल्या सुवर्ण मंदीराला आज संभाजीराजे यांनी सहकुटूंब भेट दिल्याचं ट्विटरवरून सांगितलंय.
देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर. संत नामदेवांनी घुमान मध्ये राहून केलेलं प्रबोधन असेल, किंवा नववे शीख गुरु गुरु गोविंदसिंहांना महाराष्ट्रात मराठ्यांनी केलेल्या सहकार्य असेल या दोन्ही मूळे सांस्कृतिक आणि पराक्रमी एकोपा जपला गेला आहे, असं ट्विट खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
पानिपतच्या लढाईच्या आधी आणि नंतर इथल्या संपन्न प्रदेशात मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी मोठा पराक्रम केला आहे. तो इतिहास देखील पाहण्यासारखा आहे, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून आम्हा सर्वांचा जो आदरसत्कार केला याबद्दल शिखबंधूंचे मनापासून आभार संभाजीराजेंनी मानले आहेत.
पानिपतच्या लढाईच्या आधी आणि नंतर इथल्या संपन्न प्रदेशात मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी मोठा पराक्रम केला आहे. तो इतिहास देखील पाहण्यासारखा आहे.
छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून आम्हा सर्वांचा जो आदरसत्कार केला याबद्दल शिखबंधूंचे मनापासून आभार.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पर्यावरणाविषयी बोलताना दिया मिर्झा ढसाढसा रडली!
सत्ता असताना गोट्या खेळत होता का?- इम्तियाज जलील
महत्वाच्या बातम्या-
“जोपर्यंत ‘या’ ३ नेत्यांचा वरदहस्त तोपर्यंत महाविकास आघाडीचंच सरकार”
पाकिस्तानला 10 दिवसांत धूळ चारू- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मतदारसंघातील लोकांचे अडीअडचणीचे प्रश्न, खासदार कोल्हेंची समाधानकारक उत्तरं!
Comments are closed.